शिरूर- अशोक पवार यांच्या प्रचारार्थ शिरूर शहरामध्ये घरोघरी पदयात्रा!
शिरूर ( प्रतिनिधी ) सुदर्शन दरेकर
शहरातील आनंद सोसायटी,श्री हाईट्स, नक्षत्र सोसायटी,व बरमेच्या कॉम्प्लेक्स या परिसरामध्ये घर टू घर जाऊन मतदारांशी संवाद साधत राष्ट्रवादी काँग्रेस शहर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुतारी हे चिन्ह घराघरापर्यंत पोहोचवण्याचे काम कार्यकर्ते करताना दिसत आहेत अशोक पवार यांनी विधानसभेत अनेक विषय मार्गी लावलेले आहेत त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा संधी द्यावी अशी विनंती कार्यकर्ते करताना दिसत आहेत. यावेळी महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येत होता. शिरूर तालुक्यात औद्योगीकरण झपाट्याने वाढत असताना, शहराची लोकसंख्या ही वाढत आहे. नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीच पुन्हा एकदा अशोक पवार यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन कार्यकर्ते करताना दिसत आहेत.
